चुस्त आणि शिस्त हे छात्रसेनेचे वैशिष्ट्य-----52 महाराष्ट्र बटालियनच्या शिबीरात अभिजीत राऊत

मुगट (ता. मुदखेड) येथे 52 महाराष्ट्र बटालिनय राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक शिबीर पार पडले. यावेळी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.त्यांना पदकं देवून गौरविण्यात आले.
-----
चुस्त आणि शिस्त हे छात्रसेनेचे वैशिष्ट्य
-----
52 महाराष्ट्र बटालियनच्या शिबीरात अभिजीत राऊत
----
नांदेड ः देश मस्त असावा, असे वाटत असेल तर प्रत्येक विद्यार्थी, युवकाने शारिरीक दृष्ट्या चुस्त असावे, त्यांच्या अंगी शिस्त असणे आवश्यक आहे. नवनिर्मितीत तो व्यस्त असेल तर आणखीच स्वागतार्ह. देशप्रेमी विद्यार्थी घडवणे हे राष्ट्रीय छात्रसेनेचे उद्दिष्ट आहेच, परंतु व्यक्तिमत्व विकास होणेही तेवढेच महत्वाचे आहे, सुस्त आणि शिस्तबद्ध विद्यार्थी हे छात्रसेनेचे वैशिष्ट्य आहे, असे मत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केले.
मुगट (ता. मुदखेड) येथील मातासाहिब गुरुद्वारा परिसरात 52 महाराष्ट्र बटालियनचे वार्षिक प्रशिक्षण शिबीर नुकतेच पार पडले. यावेळी श्री राऊत यांनी छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांसमोर आपली भूमिका विषद केली. 26 नोव्हेंबर 1948 ला राष्ट्रीय छात्र सेनेची (N.C.C.) स्थापना करण्यात आली. लष्करासारखा कडक गणवेष, कडक शिस्त, धाडसी वृत्ती हे छात्रसेनेचे वैशिष्ट्य आहे. युद्धप्रसंगी रणांगणात उतरण्याची संधीही या विद्यार्थ्याना मिळू शकते. पाकिस्तानविरुद्धच्या 1965 व 1974 या दोन्ही युद्धात सैनिकांना हत्यार आणि गोळाबारुद पुरवणे, शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये मदत करणे, तसेच शहरात गस्त घालणे इत्यादी कामात एन.सी.सी. विद्यार्थ्यांनी सेवा बजावली आहे.
नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांसाठी 52 महाराष्ट्र बटालियन स्थापन करण्यात आली आहे. त्याचे वार्षिक प्रशिक्षण शिबीर मातासाहिब गुरुद्वारा परिसरात पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये सैन्याविषयी आवड निर्माण करणे, देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक निर्माण करणे या मुख्य उद्देशासोबत राष्ट्रीय छात्रसेनेत व्यक्तिमत्व विकासही घडत जातो. प्रशिक्षणातील सातत्य, देशसेवेसाठी उच्चप्रतिच्या शिस्तबद्ध सैनिक निर्मितीत होते. असेही श्री राऊत म्हणाले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.
याुवेळी रस्ता सुरक्षेबाबत परिवहन विभागाच्यावतीने जागर करण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, संदीप निमसे, बालाजी जाधव यांनी माहिती दिली. ध्वज पट सुशोभिकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनेक ज्वलंत विषयावर माहिती दिली. त्यांना लेफ्टनंट प्रशांत सराफ, अशोक शिंदे, सोपान साबळे, सुनील भोसीकर, सुखदा नवशिंदे, देविदास ढवळे, मनिष कुलकर्णी आदींचे मार्गदर्शन लाभले. कर्नल रंगाराव यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले. यावेळी गुजराती विद्यालयाचे मुख्याध्यापक रवी सुमठाणकर, दामा सेठ, आदींसह इतर काही मान्यवरांची उपस्थिती होती.

टिप्पण्या