रखेंगे मुलाकात चाय पे एक दिन

 रखेंगे मुलाकात चाय पे एक दिन

-----
आंतरराष्ट्रीय चहा दिन उत्साहात साजरा
----


नांदेड ः महेश राजे : जातीवंत उत्साही मनुष्य प्राण्याला उत्सव साजरा करण्याचे फक्त निमित्त लागते आणि हे निमित्तही तो स्वतःच निर्माण करतो. त्यासाठी त्याने 'दिन विशेष'ची भन्नाट शक्कल लढवली. आज काय तर 'व्हॅलेंटाईन डे', उद्या 'फ्रेंडशिप डे', परवा 'मदर्स डे', हे झाले नात्यांचे दिनविशेष. तद्वतच दररोज कोणता ना कोणता 'डे' असतोच. काल गुरुवारी (दि. 15) 'आंतरराष्ट्रीय चहा दिन' साजरा झाला. याच चहाला आठ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी 'चाय पे चर्चा' अभियान राबवत लब्ध प्रतिष्ठा मिळवून दिली.
"गुजर जाएंगे ये मुश्किल के दिन!
रखेंगे चाय पर मुलाकात एक दिन!!"
लोकांमध्ये जे प्रिय त्यावर कवींनी कविता लिहिली नाही तरच नवल. शायरांनीही शराब, शबाब वर ज्याप्रमाणे हजारो गजल लिहिल्या त्याचप्रमाणे अगदी पाणी आणि चहावरही शायरी पहायला मिळते. जगात पाण्यानंतर सर्वात जास्त पिले जाणारे पेय कोणते असेल तर ते चहा. 
"महफिल में जो मिले, 
इंकार तो नही मगर!
तन्हाई मे अक्सर मैंने 
चाय से वफा मांगी है!!"
महफिल म्हटलं की जाम हा आलाच, परंतु काही मैफिली चहावर सुद्धा रंगतात. चहा हा ब्रिटाशांनी भारतात आणला असे म्हटले जाते; परंतु इतिहासाचा धांडोळा घेतला असता तो मुळातच भारतीयांचा शोध होय. बौद्ध भिक्खुंना याचा शोध लागल्याची नोंद वाचायला मिळाली. 16 व्या दशकापर्यंत लोकांनी चहाच्या पानांचा वापर भाजीच्या रुपात केला. तसेच याला वाटून ते काळं पेय बनवून त्याचं सेवन केले जायचे. पण, 19 व्या शतकात भारतात याचं उत्पादन ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने सुरु केलं. त्यासोबतच त्यांनी आसाममध्ये चहाची पहिली बागही सुरु केली. त्यानंतर चहाचं चलन वाढल्ं, असे सांंगण्यात येते.
"यूं तो बहुत सख्त है मेरा दिल!
पर कम्बख्त चाय पर पिघल जाता है!!"
अनेक ठिकाणी क्षुल्लक कारणावरुन वाद सुरु होतात आणि ते विकोपाला जातात. परंतु त्यात एखाद्याने चहाचा गनिमी कावा पुढे रेटला की सामंजस्यानेही वाद मिटतात. आजही ग्रामीण भागात चहाच्या काळ्या पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखाद्या घरी चहाला विचारले नाही तर तो थेट अपमानच ठरतो. चहाच्या काळ्या पाण्यालाही जो विचारत नाही, त्याच्याशी नाते ते काय म्हणून जोडायचे, असा प्रश्न उपस्थित होतो. लग्नाच्या बोलाचालीत तर चहाशिवाय 'ब्र' देखील निघत नाही.
"मुझे सुकुन चाहिए, 
या फिर यूं कहो मुझे चाय चाहिए"
इथपर्यंत कविंनी चहाला महत्त्व दिलेले दिसून येते. चहाच्या चुस्कीबरोबर संपूर्ण थकावट दूर होते, असा म्हणवा आहे. ज्यांनी चहाची चव चाखली त्यांनाच त्यातील मजा कळते, असेही चहाबहाद्दर अभिमानाने सांगत असतात.
भारतात दार्जिलिंग, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये चहाच्या महत्त्वाच्या बागा आहेत. टी बोर्ड आॅफ इंडियाच्या माहितीनुसार सध्या संपूर्ण आसाममध्ये एकीूण 43 हजार 292 चहाच्या बागा आहेत. चहाचे प्रकारही वेळ, काळ, प्रदेश परत्वे बदलत जातात. हिमाचल प्रदेशातील कांगडा भाग देखील चहाच्या मळ्यांसाठी प्रसद्ध य़आहे. या परिसरात 1829 पासून चहाचे उत्पादन घेतले जाते. हिरवा आणि काळ्या रंगाचा चहा येथे पिकवला जातो. कांगडा टी हा प्रकार देखील दार्जिलिंग आणि आसाम टी प्रमाणेच लोकप्रिय आहे.
"बैठ जाता हूं मैं अक्सर वहाँ, 
चाय की खुशबु आती हो जहाँ"
चहा मग तो फाईव्ह स्टार मधील असो वा रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवरचा महत्त्व सारखेच. फरक फक्त बनवण्याच्या पद्धतीतला. अनेक गर्भश्रीमंतांनाही टपरी चहाच आवडतो. त्यासाठी मग ते स्टेटसला फार महत्व देत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर 2014 सालची लोकसभा निवडणूकच 'चाय पे चर्चा' या अभियानावर सहजसाध्य केली. तेव्हापासून चहाला अधिकच प्रतिष्ठा मिळाली. भारतात येणाऱ्या परदेशी शाही पाहुण्यांचे स्वागतही मोदी चहानेच करतात, असे सांगण्यात येते. आनंदात, दुःखात, संकटात, अशा सर्वच प्रसंगी चहाचा घोट थोडं मन मोकळं करुन जातो, असे म्हणतात. 
"चाय जैसे उबल रही है जिंदगी
मगर हम भी हर घुंट का आनंद 
शौक से लेंगे"
प्रेयसीबरोबर एकांत उपभोगल्यानंतर प्रियकराला चहाचा आस्वाद कसा वाटतो, याचे वर्णनही शायर फार आकर्षक करतो.
"चाय अब पहले से थोडी ज्यादा मिठी लगती है मुझको,
उफ्फ... तुम्हारे होठोंकी मिठास न चखी होती तो अच्छा होता"
चहा हे एकप्रकारचं व्यसनच आहे. त्याची तलब लागली की तो पिल्याशिवाय सुचतच नाही. अनेकांना तर सकाळचे विधीही चहाचा घोट घेतल्याशिवाय होत नाही. दुपारचा चहा नाही घेतल्यास डोके गरगरायला लागते, अशी वाक्ये आपण नेहमीच ऐकतो. ज्यांना हे व्यसन नाही त्यांना आश्चर्य वाटते, पण सहव्यसनी गळ्यात गळे घालून टपरी शोधायला निघतात.
"आदत नहीं कुछ लाईलाज बिमारी है!
चाय से मेरी कुछ इस कदर यारी है!!"
-----

"लहेजा जरा ठंडा रखे जनाब
गरम तो हमें सिर्फ चाय पसंद है!"
अमेरिकेचे तत्कालीन पंतप्रधान बराक ओबामा हे भारतात आले तेव्हा त्यांचे स्वागत मोदींनी चहानेच केले. दोघांची चहा घेतानाची एकत्रित छायाचित्रेही खूप चर्चिली गेली. त्यावेळी मोदींनी त्यांना जरा सबुरीने असाच तर सल्ला दिला नसावा, अशी कॅप्शनही काहींच्या चर्चेत होती. 

टिप्पण्या