गोधन जपण्याची लोकचळवळ शिखरावर


गोधन जपण्याची लोकचळवळ शिखरावर
----
विविध गोशाळांतून दीड हजारावर गोवंशांचे पालन
-----
महेश राजे
नांदेड ः नांदेडभूषण संतबाबा जगदीशजी महाराज यांनी सर्वप्रथम गाडीपुरा येथे गोशाळा स्फातन करुन गोवंशाचेरक्षण करण्याची मुहगूर्तमेढ रोवली.या उपक्रमाची लोकचळवळ झाली असून ती आता आठ ते दहा गोशाळांच्या माध्यमातून शिखरावर पोचते आहे. दरम्यान, लम्पी रोगाचा प्रादूर्भाव लक्षात घेवून सर्वच गोशाळांतील सुमारे 1800 गोवंशाचे लसीकरण करण्यात आले आहे.
 चाऱ्यापासून वैद्यकीय उपचारापर्यंत गोसेवेसाठी गोभक्तांचा समारे 500 जणांचा एक समूह शहरात कार्यरत आहे.
हिंदू वैदीक धर्मात गायीला गोमाताअसे संबोधण्यातआले आहे. तसेच कामधेनू म्हणूनही गोमातेला ओखळे जाते. आईच्या दुधाला पर्याय म्हणून गायीच्या दुधाचे महत्त्व आहे. दुधापासून दही, ताक, लोणी, पनीर असे विविध उपपदार्थ बनविण्यात येतात. पृष्वीवरचे अमृत असेही दुधाला संबोधण्यात येते. गोदान एक पवित्र दान मानले गेले आहे. त्याप्रमाणे गोरक्षण आणि गो पुजन याचेही अनन्य साधारण महत्व वेदांतामध्ये आहे. हिंदू सणांच्या मांदीयाळीत दिवाळी या महत्त्वाच्या सणाची सुरवात वसूबारस या सणाने होते. यादिवशी गाय-वासराचे पुजन केले जाते. पोळाच्या दिवशी बैलाचे पुजन केले जाते.ऋषी पंचनमीला बैलाच्या परिश्रमाने पिकवलेले अन्न ग्रहण केले जात नाही. दरम्यान, कालौघात कमी कमी होत जाणारी शेतजमीन आणि शेतीकामात वाढत जाणारे यांत्रिकीकरण यामुळे गोधन पाळणे आणि पोसणे कठिण होत चालले आहे. परिणामी गोधन खाटकाला विकण्याचे प्रमाण वाढत चालले होते. याबाबत शासनाने गोहत्या बंदीचा कायदाच केला आहे.
वरील परिस्थीतीत भाकड जनावरांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याला पर्याय म्हणून हिंदू धर्माभिमानी तसेच गो-भक्तांनी एकत्र येत गोशाळेचा उपक्रम हाती घेतला आहे. नांदडेमध्ये अशा सुमारे गोभक्तांचा मेळा कार्यरत आहे. यापैकी कोणीही प्रसिद्धीसाठी हे पुण्यकर्म करत नाही, त्यामुळे कोणाचेही नाव घेणे इष्ट नाही. परंतु संतबाबा जगदीशजी महाराज यांच्या प्रेरणेने ही गोसेवा अखंडसुरु आहे. पूर्वी गाडीपुरा येथे एक गोरक्षण होते. त्यानंतर अर्धापूर मार्गावर खडकूत येथे विस्तीर्ण जागेवर एक गोशाळा बांधण्यातआली. गाडीपुरा येथे सुमारे 225 तर खडकूत येथे सुमारे 700 गोधन आहे. साईमंदीर वसरणी येथे 190, काकांडी येथे 200 तर उस्माननगर रोडवर दिनेश महाराजांच्या गोशाळेत 40 गोवंशाचे पालनपोषण होते. रत्नेश्वरी येथे 160 तर तरोडा येथे सुमारे 120 गोधन आहे. अशाप्रकारे सर्व गोशाळांत मिळून सुमारे 1800 गोधनाचे पालन पोषण होते.
गोसेवा समितीमार्फत सर्व गोशाळांतील गोवंशाला चारा-पाण्यासह आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. स्वतःचा किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा वाढदिवस, लग्नाचा वर्धापन दिन अशा औपचारिकतेसाठी येणारा खर्च गोसेवासाठी वस्तुरुपाने दिला जातो. राजस्थानमध्ये लम्पी रोगाचा प्रादूर्भाव पुढे येताच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कडूलिंबापासून तयार होणारे तेल, करंजीचे तेल गोशाळेत फवारण्यात येत आहे. त्यामुळे डासांचा उपद्रव होत नाही. गोभक्त लागेल तेवढे तेल पुरवतात. शिवाय महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्वच गोधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. चारापेंडी, खल्ली, गुळ आदी वस्तू गोभक्त दान स्वरुपात देतात. जीभेला आलेले फोड कमी व्हावेतयासाठी शेंदेमीठदिले जाते. जनावरे ते चाटतातआणि त्यांना चारा भक्षण करणे सोपे जाते. याशिवाय भुईमुगाच्या शेंगा तसेच तुरीच्या शेंगांचे टरफल चारा म्हणून दिले जाते. ऊसाचे हिरवे वाडे गोधनाचे विशिष्ट आवडीचे असते. दरम्यान, शिजवलेले कोणतेही पदार्थ दिले जात नाहीत. त्यामुळे जनावरांची पचनसंस्था बिघडते.
----
दूध, गोकाष्ठाची विक्री
गोशाळेत भाकड गायींचाच भरणा अधिक असला तरी दुभती जनावरेही आहेत. अशा ठिकाणी पॅकींगच्या माध्यमातून दुधाची विक्री होते. शेणापासून गोकाष्ठ (लाकडाची) निर्माण केले जाते. पाच ते सात रुपये किलो या प्रमाणे हे लाकूड विकले जाते. अंत्यविधी तसेच होम-हवानासाठीही त्याचा वापर होतो. तुलादान, गोपूजन, गोदान या माध्यमातूनही गोवंशाची सेवा केली जाते. गरजू शेतकऱ्यांना अल्प दराने गोवंश विक्री केला जातो. गोपुजनासाठी 2100 रुपये तर गोदानासाठी सहा हजार रुपये खर्च येतो, अशी माहिती गोभक्त कचरुलाल बजाज यांनी दिली.
Show quoted text

टिप्पण्या