आला सुट्ट्यांचा महिना, झटपट बँकींग आटपा...!

आला सुट्ट्यांचा महिना, झटपट बँकींग आटपा...!
----
'ऑनलाईन'वर मदार ः मार्चमध्ये तब्बल 12 दिवस सुट्ट्या
-----
नांदेड ः हिंदुंच्या सणावारांना येत्या महिन्यात शिमग्याने सुरुवात होत आहे. या महिन्याचा शेवट रामनवमीने होणार असून दुसरा व चौथा शनिवार, रविवार धरुन मार्चमध्ये तब्बल 12 सुटुट्या आहेत. त्यामुळे बँकांशी संबंधित कामे वेळात वेळ काढून आटोपणे महत्वाचे असेल. ऑनलाईन व्यवहार मात्र निष्कंटक सुरु राहतील. एटीएमवर सुद्धा फार अवलंबून राहता येणार नाही. नवीन वर्षातील दुसरा फेब्रुवारी महिन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. 
येत्या मार्च महिन्यात दरवर्षीप्रमाणे  हिंदू तसेच मराठी सणावारांना सुरुवात होणार आहे. पहिलाच सण दि. 7 मार्च रोजी होळी अर्थात शिमगा आहे. तत्पूर्वी दि. 5 रोजी रविवारची सुटी असेेल. मार्चमध्ये दि. 3, 5, 7, 8, 9, 11, 12, 19,22, 25, 26 आणि दि. 30 रोजी निगोशिएबल इन्स्ट्रमेंट ऍक्ट अंतर्गत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या महिन्यात तब्बल 12 दिवस बँकांना सुट्टी असेल. दि. 7 च्या होळीनंतर दुसरेच दिवशी दि. 8 रोजी धूलिवंदन अर्थात धूळवडची सुट्टी असेल. दि. 11 मार्च रोजी दुसरा शनिवार असल्याचे सुट्टी आहे.
दि. 12 रोजी रविवारची तसेच दि. 19 रोजी रविवारची सुट्टी आहे. दि. 2 मार्च रोजी मराठी तसेच तेलगू नवीन वर्ष गुढी पाडव्याची सुट्टी आहे. दि. 25 रोजी चौथा शनिवार तर दि. 26 रोजी रविवारीच सुट्टी असेल. दि. 30 मार्च रोजी रामनवमीची सुट्टी असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी वेळेत बँकांशी संबंधित कामे उरकून घेणे महत्वाचे असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे बँकांना सुट्टी जाहीर करण्यात येते. पण सर्वच राज्यात बँकांनना एकाच दिवशी सुुट्ट्या असतातच असे नाही.पण मोठ्या सणांना मात्र देशभरातील बँका बंद असतात.
बँकेला सुट्टी असली की शटर डाऊन असते, अर्थात बँकिंगचे काम पूर्णपणे थांबत नाही. ऑनलाईन बँकिंग सेवा सुरळीत चालू असते. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार सुट्टीच्या दिवशीही करता येतात. पण एटीएममध्ये रोकड असेलच असे नाही. शिवाय क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुनही ऑनलाईन पेमेंट करता येऊ शकते.
-------
मार्च महिन्यातील सुट्ट्या
दि. 5 मार्च - रविवार सुट्टी
दि. 7 मार्च - होळी
दि. 8 मार्च - धूलिवंदन
दि. 11 मार्च - दुसरा शनिवार
दि. 12 मार्च - रविवार
दि. 19 मार्च - रविवार
दि. 22 मार्च - गुढीपाडवा
दि. 25 मार्च - चौथा शनिवार
दि. 26 मार्च रविवार
दि. 30 मार्च - रामनवमी

टिप्पण्या