खबरदार sss बालविवाह लावाल तर ... !

खबरदार sss बालविवाह लावाल तर ... !
---
अक्षय्य तृतियेच्या निमित्त प्रशासनाची 'टाईट फिल्डींग'
---
नांदेड ः हिंदू संस्कृतीत साडे तीन मुहूर्तांना अतिशय महत्त्व आहे. अक्षय्य तृतिया त्यापैकीच एकू पूर्ण मुहूर्त. या दिवशी सामूहिक विवाह समारंभाच्या आयोजनाची प्रथा आहे. प ैकी बहुतांश विवाह बालविवाल असतात, असे निरीक्षण आहे. हे प्रकार रोकण्यासाठी महिला व बाल आयुक्तालयाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क केले असून त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे.
अक्षय्य तृतियेचे महत्व
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध ततिया या दिवशी अक्षय्य तृतिया येते. ह्या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती, नर-नारायण या जदोडदेवाची जयंती, भगवान परशुराम जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत या ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला. आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका आहे. शेती संबंधित कामांची सुरवातही याच दिवशी केली जाते..
बालविवाहाची प्रथा
अक्षय्य तृतिया या दिवशी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होतात. किंबहुना तशी प्रथाच आहे, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. हा अघोरी प्रकार रोकण्यासाठी आता शासनाने कंबर कसली असूून केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांनुसार महिला व बालकविकास आयुक्तालयाने जानेवारीच्या सुरवातीपासूनच व्ही.सी.द्वारे वारंवार बैठका घेऊन सूचना केल्या आहेत. त्याबरहुकूम कारवाई अपेक्षित आहे.
बाल हक्कांवर गदा
बालविवाह ही प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार असे विवाह बेकायदा ठरतात आणि याविरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शङरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांनी अधिक सजग राहून असे विवाह होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना आहेत.
------
राज्यात 906 विवाह रोकले
बालविवाह प्रतिबंधक कायदा संपूर्ण राज्यात लागू असून बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. तरीही असे प्रकार होतात. जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत राज्यातील वेगवेगळ्या भागात एकूण 906 बालविवाह रोखण्यात प्रशासनास यश आले आहे. सजग नागरिकांनीही ही आपली जबाबदारी समजून बालहक्कांचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

टिप्पण्या