- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बंद विमानतळांचं करणार काय?
----
अशोक चव्हाण ः राज्यातील 11 विमानतळं शोभेची वास्तू
--
नांदेड ः राज्यात एकूण 18 विमानतळं आहेत. पैकी 11 विमानतळांवर वाहतूक नाही. केवळ सात विमानतळं कार्यरत आहेत, हे चित्र पुरोगामी महाराष्ट्रासाठी चांगले नाही. यात केंद्राने हस्तक्षेप करण्याची गरज आहे, असे मत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. 'एबीी माझा'ने घेतलेल्या मुलाखतप्रसंगी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यी मागील टर्ममध्ये बंद पडलेल्या विमानतळांना पुनरुज्जिवित करण्यासाठी 'उडान' योजना आणली होती. पुढे मुदत संपल्यानंतर ती बंद पडली. परिणामी अनेक विमानतळं शोभेची वास्तू बनले आहेत. दळणवळणाच्या गतीमान सोयी असतील तर अविकसीत भागात उद्योग उभारले जावून विुकासाला चालना मिळेल. सध्या राज्याचे चित्र पाहता, मुंबई-पुणे-नाशिक या त्रिकोणातच औद्योगिक विकास झाला आहे. त्यानंतर काही प्रमाणात नागपूर व औरंगाबाद येथे औद्योगिकरण आहे. गडचिरोली व हिंगोली हे दोन जिल्हे तर 'नो इंडस्ट्री झोन' मध्ये येतात. मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांची अवस्थाही वेगळी नाही. गुंतवणूकदार कोणताही असो त्याचे निवासस्थान व मुख्यालय मुंबई येथेच असेल. त्यामुळे मुंबईहून जिथपर्यंत कमीतकमी वेळात पोचता येईल, तिथेच तो गुंतवणूक करेल. त्यामुळे राज्यातील मोठ्या व अविकसीत जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली विमानतळं प्रवासी वाहतुकीसाठी सुरु व्हायला हवीत, अशी अपेक्षा श्री चव्हाण यांनी व्यक्त केली. अर्थात त्यांचा रोख मागील सुमारे वर्षभरापासून बंद पडलेल्या नांदेड विमानतळाकडे होता. मुंबय़ईहून नांदेडचे अंतर 600 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. रस्तामार्गे व रेल्वेमार्गे किमान 10 ते 12 तास लागतात. या परिस्थितीत नांदेडमध्ये गुंतवणक कशी येईल, असा प्रश्नही श्री चव्हाण यांनी उपस्थित केला.
शिंदे-फडणवीस सरकारने प्रत्येक तालुकास्तरावर हेलीपॅड बांधण्याचे धोरण जाहीर केले आहे. पण बंद पडलेल्या विमानतळाबाबतही शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. भविष्यात वैद्यकीय सेवा तताडीने उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने हेलीपॅड उभारणी व धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दि. 28 नोव्हेंबर रोजी दिले होते. याच धर्तीवर शासनाने आपल्या स्तरावर प्रयत्न करुन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा व नांदेडसह राज्यातील 11 विमानतळावर एअर सर्व्हिस सुरु करावी, अशी अपेक्षाहीी श्री चव्हाण यांनी व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा